सौरऊर्जा काळाची गरज

सौरऊर्जा :



म्हणजे सुर्यापासून मिळवलेली ऊर्जा. सुर्य हा पृथ्वीवरील प्रमुख नैसर्गिक ऊर्जास्रोत आहे. ऊर्जेची गरज सध्याच्या तुलनेत काही पटीत वाढेल आणि सध्या वीजनिर्माण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आण्विक ऊर्जा क्षेत्राने दिवसाला एक अशा गतीने अणुभट्ट्या उभारल्या तरी ही गरज पुरी होण्यासारखी नाही. शिवाय जपानमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जगानेही अणुप्रकल्पांचा फेरविचार करण्यास सुरवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सौरऊर्जेचा विचार केला असता एका तासात पृथ्वीवर पडणारी सौरऊर्जा ही रूपांतरित केल्यास आपली एका वर्षाची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी पुरेशी असते, मात्र हे प्रत्यक्षात आणण्यासाठी आणखी बऱ्याच संशोधनाची आवश्यकता आहे. अपारंपारिक आणि विशेषतः सौरऊर्जा क्षेत्रातील संशोधनावरील निधी तसेच जागरूकता दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याच्या पारंपारिक ऊर्जास्रोतांचे पर्याय फक्त अजून काही वर्षेच उपलब्ध असणार आहेत. शिवाय त्यांच्या अनेक नकारात्मक बाजूही आहेत. अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात सौरऊर्जेशिवाय वायुऊर्जा, टायडल, जिओथर्मल असे पर्याय आहेत. मात्र, भविष्यकाळातील ऊर्जेची गरज काही अंशीच भागवण्याची क्षमता त्यात आहे. सध्या सौरऊर्जा क्षेत्रातील संशोधन हे मुख्यतः सौरऊर्जा ही पारंपरिक ऊर्जास्रोतांपेक्षा कमी खर्चिक करण्यासाठी चालू आहे. जपान, जर्मनी या सौरऊर्जेतील परंपरागत शिलेदारांसकट अमेरिका शिवाय चीन आणि भारतानेही याबाबत पुढाकार घेतला आहे. सौरऊर्जा निर्मितीत आणि नंतर वापरातही कुठल्याही प्रकारचे अपायकारक वायू वातावरणात सोडले जात नाहीत. त्यामुळे प्रदूषण, ग्लोबल वार्मिंगसारखे इतर ऊर्जाक्षेत्रांशी निगडित वादांचे विषय सौरऊर्जेपासून मात्र चार हात दूरच आहेत.



सौरऊर्जेचा वापरसंपादन करा

  1. हरितद्रव्य असणारी सर्व झाडे, सुक्ष्मजीव इत्यादी.
  1. बाष्पीभवन
  1. मनुष्यप्राण्यात ड-जीवनसत्व बनवण्यासाठी, सौरविद्युत

ऊर्जा संसाधनेसंपादन करा

ऊर्जा संसाधनाचे वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते
  • पारंपारिक ऊर्जा संसाधने
सरपण, शेणाच्या गोवर्‍या, पेंढा हे पारंपारिक इंधन वर्षानुवर्षे वापरले जात आहे. याशिवाय कोळसा, खनिज तेल, जल ऊर्जा, अणुऊर्जा इत्यादींचा पारंपारिक ऊर्जा संसाधनांत समावेश होतो
  • अपारंपारिक ऊर्जा संसाधने

सौरऊर्जेचा महत्वसंपादन करा

  • सूर्य हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. सौर ऊर्जा घेण्यासाठी घरात कुठल्याही प्रकारचा मीटर बसवावा लागत नाही व कुठलेही बिल भरावे लागत नाही.
  • मोठ्या प्रमाणात सूर्याची ऊर्जा उपलब्ध असून त्याचा आपण जर उपयोग करू शकलो तर निसर्गातील झाडांची तोड थांबू शकेल. त्यामुळे पर्यावरण र्हासालाही आळा बसेल.
  • दिवसातील १२ तास सौर ऊर्जा आपल्या बरोबरच असते. उरलेल्या १२ तासांसाठी आपण सौर ऊर्जेची साठवण करून रात्रीच्या वेळी उपयोगात आणू शकतो यासाठी खर्च सुद्धा अल्पप्रमाणात येतो.
 अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत आहे, तसेच देशाच्या आर्थिक वाढीसाठी व कल्याणासाठी महत्त्वाच्या असलेल्या पायाभूत सुविधांसाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. शून्य उत्सर्जनामुळे, सौरऊर्जेमध्ये प्रचंड क्षमता असून, विविध प्रकारच्या उपकरणांमुळे ही क्षमता वाढवता येऊ  शकते. विशिष्ट विकासामुळे, तसेच कमीतकमी देखभालीमुळे सौरऊर्जा औद्योगिक व देशांतर्गत वरदान ठरली आहे. सरकारकडून करसवलत आणि वजावट यामुळे ती आर्थिकदृष्टय़ा व्यवहार्य ठरू शकते. आपरंपरिक ऊर्जेचा प्रमुख स्रोत म्हणून अनेक विकसित देशात आता सौरऊर्जेचा जास्तीतजास्त वापर करू लागले आहेत.
गेल्या काही वर्षांत केवळ ग्लोबल वॉर्मिग या प्रश्नावर भर देण्याऐवजी ऊर्जाबचत आणि पैसेबचत याविषयी जागृती वाढवली आहे. सध्या आपल्याकडे सौरऊर्जेच्या वापराचा, त्यातही प्रामुख्याने सोलार वॉटर हीटरचा, अधिक विचार होऊ  लागला आहे.

महत्वाची भूमिका बजावणारे घटक :

– विजेचे वाढते दर, दरवर्षी अंदाजे १०% दरवाढ
– काळानुसार, लोकांचा सौरऊर्जेवरील विश्वास वाढत असून, सौर उपकरणे खरेच पैसे वाचवत असल्याची जाणीव लोकांना होत आहे.
आता सौर उत्पादनांमध्येही नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान बाजारात आले आहे. चांगल्या दर्जाच्या सोलार वॉटर बसवण्यासाठी अंदाजे १७,५०० ते २०,००० रुपये खर्च येतो.
चार जणांचा समावेश असलेल्या कुटुंबाला दररोज अंदाजे १०० लिटर गरम पाणी लागते. त्यासाठी दररोज अंदाजे ५ युनिट वीज लागते. त्यामुळे, महिन्यात ५ प् ३०= १५० युनिट वीज वापरली जाते.
गेल्या काही वर्षांमध्ये, विजेचे दर कमालीचे वाढले आहेत. भारतभरातील रहिवाशांना वाढत्या वीजबिलाचे चटके सहन करावे लागत आहेत. भारतात विजेची मागणी सातत्याने वाढत आहे आणि ऊर्जेचे स्रोत झपाटय़ाने कमी होत आहेत. विजेचे संकट ओढवण्यापूर्वी पर्यायाचा विचार करणे महत्त्वाचे आहे. या वास्तवामुळे सरकारला अपारंपरिक ऊर्जेवर भर देणे भाग पडले आहे. तसेच, घरामध्ये सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी सवलत देण्याची तरतूद केली आहे.
भारतातील लोकांमध्ये सौर हा पसंतीचा पर्याय आहे. केवळ किमतीमुळे किंवा पर्यावरणीय घटकांमुळे नाही, तर भारतात मिळत असलेल्या भरपूर सूर्यप्रकाशाच्या कालावधीमुळे अगदी हिमालयातही तापमान कमी असते, परंतु सूर्यप्रकाश मिळण्याचा कालावधी अधिक असतो. भारताचे मोक्याचे आणि अक्षांशाचे स्थान याबाबतीत अतिशय फायदेशीर आहे. आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे, वीज आणि इंधन यांचे दर सातत्याने वाढणार आहेत आणि त्यामुळे उर्जेचा पर्यायी व्यवहार्य उपाय करणे गरजेचे ठरणार आहे. आपल्या देशात, बहुतांश भागांमध्ये विद्युतीकरण झालेले नाही आणि वीज गायब होण्याचेही प्रकार घडतात. त्यामुळे तिथे सौरऊर्जा हा पर्याय वरदान ठरणारा आहे.


देशातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प नव्या पालघर जिल्ह्य़ातील शहापूर येथे येऊ घातला असून भारतातील सॅरस सोलर इंक कंपनीच्या माध्यमातून अमेरिकी कंपनीचा देशात तब्बल चार वर्षांनंतर पुनप्र्रवेश होत आहे. १,६०० एकर जागेवरील या प्रकल्पात ५०० मेगाव्ॉट सौर ऊर्जा निर्मिती करण्याचे लक्ष्य राखण्यात आले आहे.


सौरकृषीपंपाचे फायदे

  • दिवसा शेतीपंपास वीजेची उपलब्धता
  • दिवसा विनाव्यतय अखंडित वीज पुरवठा
  • वीज बिलापासून मुक्तता
  • डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च
  • पर्यावरण पुरक परिचलन
  • शेती सिंचनाचा भाग वीज सबसिडीपासून पृथ्थकरण करणे
  • औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती वीज ग्राहकांवरील क्रास सबसिडीचा बोजा कमीकरणे

योजनेची ठळक वैशिष्टे

  • पारेषण विरहित 1 लाख सौरकृषी पंप टप्प्या टप्प्यात उपलब्ध करुन देणे.
  • सौर कृषीपंपासोबत दोन डि.सी. एल.ई.डी बल्ब, मोबाईल चार्जिंग व बॅटरी चार्जिंगची सुविधा (बॅटरी लाभार्थांनी घ्यावी) यांचा समावेश



Comments

Post a Comment